breaking-newsराष्ट्रिय

वीरपत्नीला सलाम! गरिमा अबरोल हवाई दलाच्या वाटेवर

शहीद स्क्वाड्रन लीडर समीर अबरोल यांच्या पत्नी गरिमा अबरोल या हवाई दलाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. नुकत्याच त्या वाराणसी येथे झालेली एसएसबीची मुलाखतीत उत्तीर्ण झाल्या आहेत. तसेच त्या तेलंगणमधील डुंडीदलमधील भारतीय हवाई दलाच्या अकादमीत प्रवेश घेणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतीय हवाई दलासाठी या वर्षातील फेब्रुवारी महिना सर्वात अधिक अपघातांचा आणि जीवघेणा ठरला होता. केवळ फेब्रुवारी महिन्यामध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानांचे पाच अपघात झाले. महिन्याच्या पहिल्याच तारखेला बंगळुरूजवळ मिराज २००० विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये विमानातील दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला. हिंदुस्तान अॅरोनॉटिकल्स लिमिटेडने हे विमान अद्यावत सुविधांनी अपडेट करुन हवाई दलाकडे सूपूर्द केले होते. उड्डाण केल्यानंतर काही क्षणांमध्ये या विमानाचा अपघात झाला. या अपघातात स्क्वाड्रन लीडर सिद्धार्थ नेगी आणि स्क्वाड्रन लीडर समीर अबरोल या दोघांना वीरमरण आले होते. त्यानंतर आता त्यांच्या पत्नी गरिमा यांनी वायुदलात प्रवेश करणार आहे. दरम्यान, त्यांनी मुलाखतीची फेरी उत्तीर्ण केली असून त्या पुढील वर्षी हवाई दलाच्या अकादमीत प्रवेश घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

ANI

@ANI

Garima Abrol, wife of late Sqn Ldr Samir Abrol has cleared Services Selection Board in Varanasi&may get an opportunity to join Indian Air Force’s Air Force Academy in Dundigal in Telangana. Abrol lost his life in a Mirage 2000 crash in Bengaluru in February this year. (file pic)

554 people are talking about this

काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून समीर अबरोल यांच्यासाठी एक कविता लिहून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती. त्यांनी हवाई दलात सेवा बजावण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. गरिमा अबरोल यांनी आपल्या भावनिक पोस्टमध्ये व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवले होते. तसेच आपण आपल्या वीरांना लढण्यासाठी कालबाह्य झालेल्या मशीन्स देतो. ते त्यांनी सुद्धा शौर्य गाजवतात आपले सामर्थ्य दाखवून देतात. तो थेट आकाशातून जमिनीवर कोसळला. कुटुंबांसह त्याची स्वत:ची स्वप्न, इच्छा सर्वाचा चक्काचूर झाला. दुसऱ्यांना प्रकाशाची वाट दाखवण्यासाठी कोणाला तरी धोका पत्कारावा लागतो. मला माझ्या नवऱ्याचा अभिमान आहे असे गरिमा अबरोल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button