breaking-newsराष्ट्रिय
विमान उडवण्याची धमकी देणाऱ्या प्रवाशाला कोलकाता विमानतळावर अटक
विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या एका प्रवाशाला कोलकाता विमानतळावर अटक करण्यात आली आहे. वेदान पोद्दार असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. जेट एअरवेजच्या विमानाने तो मुंबईला जाणार होता. संशयास्पद वर्तन आणि आक्षेपार्ह कमेंटसह त्याने सेल्फी काढला होता. विमानाचे अपहरण करुन विमान उडवून देण्याबद्दल तो बोलत होता असे सूत्रांनी सांगितले.
त्याच्या संशयास्पद वर्तनानंतर त्याला मुंबईला जाणाऱ्या 9W472 विमानातून खाली उतरवून सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आले. आक्षेपार्ह कमेंटसह तो सेल्फी पाठवत असल्याचे सहप्रवाशांच्या लक्षात आले. लगेच त्यांनी ही बाब केबिन क्रू च्या लक्षात आणून दिली. या प्रकरणी चौकशी सुरु आहे असे शिवा मुरुगन यांनी सांगितले