breaking-newsराष्ट्रिय

विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी जुलैमध्ये होणार निवृत्त

‘विप्रो’चे संस्थापक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज अझीम प्रेमजी हे ३० जुलै रोजी निवृत्त होत आहेत. कंपनीने गुरुवारी (दि.६) याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. अझीम प्रेमजी यांनी ५३ वर्षे कंपनीची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली आणि कंपनीला नव्या शिखरावर नेऊन पोहोचवले.

अझीम प्रेमजी यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जागा त्यांचे पुत्र रिशद प्रेमजी घेतील. तर मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दाली नीमुचवाला हे ३१ जुलैपासून विप्रोचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम पाहतील, असे कंपनीने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.

ANI

@ANI

Abidali Z Neemuchwala to take over as Managing Director of Wipro from July 31; to also continue as the CEO of the company. Azim Premji to be the Non-Executive Director for a period of 5 years with effect from July 31 & has been conferred with title of Founder Chairman of Wipro

३३ लोक याविषयी बोलत आहेत

निवृत्तीनंतर अझीम प्रेमजी ३१ जुलैपासून पाच वर्षांसाठी कंपनीमध्ये गैर कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतील. त्याचबरोबर कंपनीने अझीम प्रेमजी यांना संस्थापक-अध्यक्ष म्हणून सन्मानित केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button