Breaking-newsराष्ट्रिय
विधानसभेच्या सभापतीपदी कॉंग्रेसचे के. आर. रमेशकुमार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/kr-rameshkumar.jpg)
बंगळूर – तत्पुर्वी कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपने ऐनवेळी माघार घेतल्याने सभापतीपदी कॉंग्रेसचे के. आर. रमेशकुमार हे बिनविरोध निवडून आले.
विधानसभेच्या अध्यक्षपदाची मर्यादा आणि सन्मान कायम राखण्यासाठी आम्ही या निवडणूकीतून माघार घेऊन रमेशकुमार यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा करीत आहोत असे सांगत भाजपने आपले उमेदवार सुरेशकुमार यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. या पदासाठी निवडणूक झाली असती तर कर्नाटकात कोणच्या बाजूने बहुमत आहे ही बाब आधीच स्पष्ट झाली असती. पण भाजपने ऐनवेळी आपला उमेदवार मागे घेऊन मतविभाजनाची वेळ टाळली.