Breaking-newsराष्ट्रिय

वडिलांनीच पोटच्या मुलीवर केला बलात्कार

वडिलांनीच पोटच्या मुलीला बंधक बनवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या भिंडमधील सिरसोदा गावात घडली आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असून आई-वडिलांसोबत राहते. राहत्या घरातच शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. पीडित मुलीने आईच्या मोबाइलवरुन पोलिसांना फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. वडिलांनी आपल्यावर अत्याचार केले त्यावेळी आई घरामध्येच होती असा दावा पीडित मुलीने केला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

मुलीने पोलिसांना बोलावल्याचे समजल्यानंतर आरोपी पिता तिथून फरार झाला. निघून जाताना त्याने मुलीला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. शनिवारी संध्याकाळी उशिरा आम्हाला फोनवरुन तक्रार मिळाली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो त्यावेळी आरोपी तिथून पसार झाला होता. पीडित मुलीच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. आम्ही मुलीची तिथून सुटका केली व आरोपी पित्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला अशी माहिती गोहद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कमल कांत दुबे यांनी दिली.

माझ्या वडिलांना मुलगा हवा होता. पण त्यांना मुलगी झाली. लहानपणापासून कुठलेही कारण नसताना ते मला सतत मारहाण करायचे असे पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे. वडिलांच्या मारहाणीमधून आई माझा बचाव करण्याचा प्रयत्न करायची पण वडिल तिला सुद्धा ‘तू मला मुलगा दिला नाहीस’ असे सांगून मारहाण करायचे.

शनिवारी संध्याकाळी वडिलांनी आधी मला एका खोलीत बंद केले नंतर मला मारहाण करुन माझ्यावर बलात्कार केला असे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे. बलात्काराची घटना घडली त्यावेळी मी दुसऱ्या रुममध्ये होते. माझ्या मुलीवर बलात्कार झाल्याचे समजले त्यावेळी मीच तिला फोन करुन पोलिसांना बोलवायला सांगितले असे पीडित मुलीच्या आईने तिच्या जबानीमध्ये म्हटले आहे. आरोपी ज्या ठिकाणी लपू शकतो अशी ठिकाणी पोलिसांनी छापे मारले आहेत पण आरोपीला पकडण्यात अजून यश मिळालेले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button