breaking-newsराष्ट्रिय

लोकपाल नियुक्‍तीची तारीख 10 दिवसात जाहीर करा

नवी दिल्ली – देशात लोकपाल नियुक्‍ती कधी करणार याबाबतचा निश्‍चित कालावधी 10 दिवसांमध्ये सादर करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला केल्या आहेत. न्या. रंजन गोगोई आणि न्या. आर. बानुमठी यांच्या पीठाने केंद्र सरकारला या संदर्भात 10 दिवसांमध्ये एक प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकपाल नियुक्‍ती संदर्भात सरकारने दिलेल्या विविध लेखी सूचनांची माहिती ऍटर्नी जनरल के.के. वेणूगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली. त्यावर लोकपाल नियुक्‍तीचा कालनिहाय कार्यक्रमच सांगा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जुलै रोजी होणार आहे.

“कॉमन कॉज’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारला या सूचना केल्या. लोकपाल नियुक्‍तीबाबतचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षी 27 एप्रिलला दिले आहेत. मात्र त्यानंतरही लोकपाल नियुक्‍ती झाली नसल्याने न्यायालयाचा अवमान करण्यात आला असल्याचा दावा या याचिकेमध्ये करण्यात आला आहे.

लोकपालमध्ये लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याचा समावेश करण्याबाबतची दुरुस्ती बाकी आहे, असे केंद्र सरकारने म्हटले होते. मात्र या कायद्यातील दुरुस्त्या होईपर्यंत अंमलबजावणी करता येणार नाही, हे समर्थन योग्य नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षीच्या सुनावणीमध्ये म्हटले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button