breaking-news

लाल कांदा दरात ५५० रूपयांची घसरण

लासलगांव | महाईन्यूज

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात लाल कांद्याच्या दरात सोमवारी मागील सप्ताहाचे तुलनेत ५५० रूपयांची घसरण झाली. बाजारात १२०३० क्विंटल कांदा आवक झाली असुन लाल कांदा किमान ११०० ते कमाल २४४२ व सरासरी २१०० रूपये भाव जाहीर झाले. गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर लाल कांद्याची १,२५,९४५ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रु पये १,१०० कमाल रु पये ३,०२६ तर सर्वसाधारण रु पये २,६२२ प्रती क्विंटल राहिले आहेत.

जानेवारी महिन्यात वाढलेली कांदा आवक व देशाची मागणी कमी झाल्याने भाव कमी झालेले आहेत. फेब्रुवारी महिन्यात कांदा आवक मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती असल्याने त्वरित कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी लासलगाव बाजार समितीच्या सभापती ै सुवर्णा जगताप यांनी केली आहे. गत सप्ताहात निफाड उपआवारावर लाल कांदा (१७,५०६ क्विंटल) भाव रु पये १,००० ते ३,१८१ सरासरी रु पये २,६२५, तर विंचुर येथील उपावारावर लाल कांदा (८६,३३३ क्विंटल) भाव रु पये १,००० ते ४,१५१ सरासरी रु पये २,४५० रूपये होते. .

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button