breaking-newsआंतरराष्टीय

लस नसेल तरी चिंता नाही! WHOने सांगितला Vaccine शिवाय कोरोनाला हरवण्याचा उपाय

लंडन: जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस काही कमी होताना दिसत नाही आहे. सध्या जगात एकूण 2 कोटी 58 लाख 89 हजार 824 कोरोनाबाधित रुग्ण आहेततर, 8 लाख 60 हजार 270 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. जगभरात तब्बल 68 लाख 56 हजार 883 अॅक्टिव्ह रुगण आहेत. त्यामुळे आता साऱ्या जगाचं लक्ष कोरोना लशीकडे लागलेले आहे. यातच आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) लशीशिवाय कोरोनाला कसे हरवायचे याचा एक मार्ग सांगितलेला आहे. WHOच्या म्हणण्यानुसार, युरोप आणि जगातील इतर देशांनी लशीशिवाय कोव्हिड-19वर नियंत्रण मिळवलेले आहे, यासाठी स्थानिक पातळीवर लॉकडाऊन लागू करणे महत्त्वाचे आहे.

युरोपच्या डब्ल्यूएचओच्या संचालकांनी सांगितले की ते राष्ट्रीय स्तरावर लॉकडाउन यशस्वी झालेले आहेत असे मला वाटत नाही, मात्र जिथे संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे, तेथे लॉकडाऊनची जास्त गरज आहे. दुसरीकडे, इटालियन शास्त्रज्ञांनी असा दावा केलेला आहे की कोरोना संक्रमित रुग्णाला व्हायरसपासून मुक्त होण्यासाठी किमान एक महिना तरी लागतो. WHOचे युरोपचे क्षेत्रीय संचालक हंस क्लुग यांनी स्काई न्यूजला सांगितले की, “कोरोनाला हरवण्यासाठी गरजेचे नाही की लशीचीच गरज आहे. जेव्हा आपण या रोगासोबत राहायला शिकू तेव्हाच आपण यावर मात करू शकू. संक्रमणाची दुसरी लाट टाळण्यासाठी स्थानिक पातळीवर लॉकडाऊन लागू करण्याची गरज आहे. यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करू काही होणार नाही, असेही क्लुग म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button