breaking-newsराष्ट्रिय
‘लष्कर ए तोयबा’च्या दहशतवाद्याला अटक
जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांना दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात यश आलं आहे. तारिक चन्ना असं या दहशतवाद्याचं नाव असून शुक्रवरी रात्री सोपोर भागामध्ये झालेल्या कारवाईदरम्यान त्याला ताब्यात घेण्यात आले.
चन्ना याच्याकडून मोठ्याप्रमाणावर शस्त्र व स्फोटकं देखील जप्त करण्यात आली आहेत. तो अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय असल्याची पोलिसांकडे नोंद आहे. त्याच्याविरोधात दहशतवाद प्रतिबंधक कायद्याखालील विविध कलमांखाली गुन्हा दखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. यापूर्वी गुरुवारी दहशतवाद्यांच्या भूमिगत गटातील दोघा सदस्यांनाही बारामुल्ला जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती.