breaking-newsराष्ट्रिय

लष्कर ए तैयबकडे नॉन-ट्रेसेबल मोबाईल फोन्स

नवी दिल्ली – लष्कर ए तैयबाकडे नॉन-ट्रेसेबल मोबाईल फोन्स उपलब्ध आहेत. लष्कर ए तैयबाच्या एएमएस (अल मुहमदीया स्टुडंट्‌स विंग )विद्यार्थी शाखेने कॉल ट्रेस होऊ न शकणारे हॅंडसेट विकसित केल्याची माहिती एनआयएला मिळाली आहे. अटकेत असलेल्या झैबुलाह नावाच्या एका दहशतवाद्याकडून ही माहिती पोलीसांना मिळाली.

लष्कर ए तैयबाचे सदस्य परस्पर संपर्कासाठी हे मोबाईल वापरणार असून भारतीय गुप्तचर संस्थेला या मोबाईल्सचा मागोवा घेता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. जर या मोबाईल्सवरील संभाषण चोरून ऐकण्याचा प्रयत्न केला, तर चालू असलेले कॉल आपोआप बंद होण्याची व्यवस्था या हॅंडसेटसमध्ये करण्यात आलेली आहे.

सन 2017 मध्ये लष्कर ए तैयबाने पाकिस्तानच्या विविध भागातून 450 युवकांची भरती केल्याचे उघड झाले आहे. बुरहान वानीच्या नावाखाली कट्टरतावादी प्रशिक्षण देऊन 15 ते 25 वयोगटातील या युवकांचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी करण्यात येणार आहे.

जम्मू-काश्‍मीरमधील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर हत्या करण्याचा लष्कर ए तैयबाचा कट सुरक्षा दलांनी अलीकडेच उधळून लावला आहे. या संबंधात 4 दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्या 6 जणांना सुरक्षा दलांनी अटक केली आहे. उत्तर काश्‍मीरमध्ये दहशतवादाचे वातावरण निर्माण करण्याचे आणि भारतीय लष्कराला मदत करणाऱ्या नागरिकांची हत्या करण्याचे स्पष्ट आदेश त्यांना पाकिस्तानी हस्तकांकडून देण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलाच्या प्रवक्‍याने दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button