Breaking-newsराष्ट्रिय
लष्करी अधिकाऱ्याचा मोलकरणीवर बलात्कार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/rapecase-01-696x392.jpg)
नवी दिल्ली– मोलकरणीवर बलात्कार केल्याच्या कारणावरून मेजर दर्जाच्या एका लष्करी अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण पश्चिम दिल्लीत गेल्या जुलै महिन्यात हा प्रकार घडला होता. या प्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर या अधिकाऱ्याच्या विरोधात 25 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तक्रारीत संबंधीत महिलेने म्हटले आहे की 12 जुलैला आपल्या पतीने आत्महत्या केली त्याच दिवशी त्याने आपल्यावर बलात्कार केला. तथापी पोलिस तपासात असेही निष्पन्न झाले आहे की बलात्काराच्या घटनेनंतरही सदर महिला त्या अधिकाऱ्याच्या घरात कामाला राहिली होती. ती त्याच्याच सर्व्हंट क्वार्टर मध्ये राहात होती. महिलेच्या तक्रारीवरून संबंधीत अधिकाऱ्याची चौकशी केली जात आहे.