Breaking-newsआंतरराष्ट्रीय
लंडन मध्ये ‘उबेर’ ला १५ महिन्यांचा परवाना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/uber-london-.jpg)
लंडन : लंडन मध्ये उबेर सेवेला १५ महिन्यांचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. त्याविषयीचा खटला कोर्टात चालू होता. लंडनच्या वाहतूक व्यवस्थेत उबेर हि एक ‘तंदुरुस्त आणि योग्य’ व्यवस्था नव्हती, असा निर्णय मागच्या वर्षी सप्टेंबर मध्ये देण्यात आला होता. त्याविषयी कोर्टात अपील करण्यास परवानगी देण्यात आली होती.
त्यानुसार १५ महिन्यासाठीचा परवाना देण्यात आला आहे. या निर्णयामुळे उबेर चे महाव्यवस्थापक टॉम एलव्हीज म्हणाले कि , ‘या निर्णयामुळे खुश आहोत. उबेर आता ग्राहकांना सर्वोत्तम सेवा पुरवण्याचा प्रयत्न करेल आणि वाहतूक व्यवस्थेचा विश्वास कमावेल.’ त्यावेळी लंडनचे महापौर म्हणाले कि , ‘उबेर बाबतच्या तक्रारीमुळे त्याचा परवाना रद्द करण्यात आला होता. आता पुढील १५ महिन्यांच्या परवान्यामध्ये घालून दिलेल्या अटींमध्ये उबेरला काम करावे लागेल.