breaking-newsआंतरराष्टीय
लंडन ते न्यूयॉर्क प्रवास फक्त २ तासांत शक्य
अटलांटा – लंडन ते न्यूयॉर्क या दोन प्रमुख शहरांना जोडण्यासाठी सध्या विमानाने ८ ते ९ तास लागतात. मात्र आता हे अंतर फक्त २ तासांत पार करण्यासाठी हायपरसोनिक विमान तयार केले जात आहे. अमेरिकेची विमान कंपनी ‘बोईंग’ने त्यासाठीची तयारी सुरू केली आहे.
अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एअरोनॉटिक्स अँड अॅस्ट्रोनॉटिक्स एव्हिएशन २०१८ या संमेलनात या विमानाबाबतची माहिती देण्यात आली. या विमानाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा पाच पट अधिक म्हणजेच तशी ४ हजार मैल या इतका प्रचंड या विमानाचा वेग असणार आहे. या विमानाची निर्मिती यशस्वीपणे पूर्ण झाल्यास लंडन आणि न्यूयॉर्क ही शहरे दोन तासांवर येणार आहेत. हे विमान तब्बल ९५ हजार फूट उंचीवर असेल. या उंचीवर हवेचा दाब अतिशय कमी असतो. त्यामुळे अपेक्षित गतीने उड्डाण करण्यास अडचण येणार नाही, असे मत या परिषदेत मांडण्यात आले.