breaking-newsटेक -तंत्र

रॉयल एनफील्डची नवी Meteor 350 बाईक याच महिन्यात लाँच होणार

नवी दिल्ली – प्रसिद्ध बाईक निर्माता कंपनी रॉयल एनफील्ड लवकरच आपली ३५० सीसीची नवीन बाईक Royal Enfield Meteor 350 घेऊन येण्याची तयारी करीत आहे. कंपनीने आतापर्यंत अधिकृतपणे लाँचिंगच्या तारखेची घोषणा केली नाही. परंतु, काही मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार याची लाँचिंग सप्टेंबर महिन्यात म्हणजेच याच महिन्यात २५ ते ३० तारखेदरम्यान लाँच करण्याची शक्यता आहे. नवी बाईक रॉयल एनफील्ड थंडरबर्ड 350X चे सक्सेसर मॉडल असणार आहे. हे तीन व्हेरियंट फायरबॉल, स्टेलर आणि सुपरनोवा मध्ये येणार आहे.

नेव्हीगेशन आणि ब्लूटूथ कनेक्टिविटी
रॉयल एनफील्ड मीटियर ३५० कंपनीची पहिली बाईक असणार आहे. ज्यात स्टँडर्ड रुपाने ट्रिपर नेव्हीगेशन सिस्टम आणि ब्लूटूथ कनेक्टिविटीसाठी फीचर्स दिले आहेत. तर मशीन अलॉय व्हील्ज, क्रोम इंडिकेटर्स, विंड स्क्रीन आणि प्रीमियम सीट फिनिश केवळ मॉडलमध्ये दिले जाणार आहे. बाईकमध्ये 100/90-19 चे फ्रंट आणि 140/70-17 टायर दिले जाणार आहे. याचे फ्यूल टँक १५ लीटरचे असणार आहे.

नवी बाईकमध्ये जबरदस्त इंजिन परफॉर्मन्स आणि कमी व्हायब्रेशन मिळणार आहे. इंजिनचे पॉवर आणि टॉर्कचा आतापर्यंत खुलासा करण्यात आले नाही. सध्या बाईक 20bhp ची पॉवर आणि 28Nm चे टॉर्क जनरेट करते. नवीन इंजिन मध्ये यापेक्षा जास्त पॉवर मिळू शकते. तसेच यात ५ स्पीड गियरबॉक्स दिले जावू शकते.

डिझाईनमध्ये कंपनीचे हे पहिले प्रोडक्शन आहे. ज्यात नवीन J1C0 प्लॅटफॉर्मवर येईल. या प्लॅटफॉर्मवर कंपनी पुढी वर्षी न्यू जनरेशन RE क्लासिक आणि बुलेट बाइक आणणार आहे. Meteor 350 च्या लुकमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. ज्यात थंडरबर्ड 350X पेक्षा थोडी वेगळी असणार आहे. बाईकमध्ये नवीन सर्क्यूलर इंस्ट्रमेंट कन्सोल मिळणार आहे. ज्यात एक छोटी डिजिटल डिस्प्ले स्क्रीन दिली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button