Breaking-newsराष्ट्रिय
‘राहुल गांधी म्हणजे पुण्यात्मा’ – कुमारस्वामी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/rahul-gandhi-and-kumarswami-.jpg)
बंगळूरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत. राहुल गांधी हे पुण्यात्मा आहेत, असं कुमारस्वामी यांनी म्हटलंय. काँग्रेसच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झालेल्या कुमारस्वामी यांनी काही शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी काँग्रेसनं मला विश्वासानं सत्ता दिली आहे, असं ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत संवाद साधताना कुमारस्वामी यांनी राहुल गांधी यांचं तोंडभरुन कौतुक केलं. ‘आज माझ्याकडे जनतेचा आशीर्वाद नाही. मात्र पुण्यात्मा राहुल गांधींनी मोठ्या विश्वासानं माझ्याकडे सत्ता सोपवली आहे. आम्हाला एक चांगली संधी मिळाली असून आम्ही या संधीचा सदुपयोग करु,’ असं कुमारस्वामी यांनी म्हटलं.