Breaking-newsराष्ट्रिय
रामदेव बाबा यांचे आता तंत्रज्ञान क्षेत्रात पाऊल; स्थापन केली नवी स्टार्टअप कंपनी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/ramdev-1.jpg)
पतंजली आयुर्वेदचे संस्थापक योग गुरु बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण आता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. त्यासाठी पतंजली आयुर्वेद समुहाद्वारे त्यांनी ‘भरुआ सोलुशन्स’ नावाची कंपनी स्थापन केली आहे. ही कंपनी वितरण साखळी व्यवस्थापन, वितरण, माती परिक्षण, फर्टिलायझर कॅल्क्युलेशन, बॅकवर्ड लिंकेज या क्षेत्रात काम करणार आहे.
पतंजली आयुर्वेदचे एमडी आचार्य बालकृष्ण म्हणाले, “भरुआ सोलुशन्सच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातूनच सध्या पतंजली आयुर्वेदची साखळी वितरण व्यवस्था चालवली जाते तसेच रिटेल बिलिंगचेही काम केले जाते. या स्टार्टअपमध्ये गेल्या एका वर्षात आत्तापर्यंत १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. बिझनेस स्टँडर्डने याबाबत वृत्त दिले आहे.