breaking-newsराष्ट्रिय

रामदेवबाबा यांना न्यायालयाची नोटीस

योगगुरू रामदेवबाबा यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन व विक्री थांबवण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालावर प्रकाशकांनी दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने रामदेवबाबा यांना नोटीस बजावली आहे.

या पुस्तकात अब्रूनुकसानी करणारा मजकूर असल्याचा दावा रामदेवबाबा यांनी केल्यानंतर या पुस्तकाचे प्रकाशन व विक्री रोखण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. आता या प्रकरणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात सुनावणी होणार आहे. न्या. मदन बी. लोकूर व न्या. दीपक गुप्ता यांनी सांगितले, की आम्ही प्रतिवादी क्रमांक १ असलेले रामदेवबाबा यांना नोटीस जारी करीत आहोत. जगरनट प्रायव्हेट लिमटेड या प्रकाशनाने पुस्तकाचे वितरण रोखण्याच्या उच्च न्यायालयाच्या २९ सप्टेंबर रोजीच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button