Breaking-newsराष्ट्रिय
राज्यसभेच्या 24 जागांसाठी दहा राज्यांमध्ये निवडणुका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Shivraj-Singh-Chouhan-.jpg)
मुंबई : राज्यसभेच्या 24 जागांसाठी आज दहा राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, मणिपूर या राज्यांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. दुपारी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार असून पाच वाजता मतमोजणी सुरु होईल.
आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, मणिपूर, मिझोराम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, झारखंड या राज्यांमध्ये राज्यसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कर्नाटकात चारही जागांवर, तर अरुणाचल प्रदेशमध्ये एका जागेवर बिनविरोध निवडणूक झाली आहे.
आंध्र प्रदेश- 4
गुजरात- 4
कर्नाटक- 4 (बिनविरोध)
राजस्थान- 3
मध्य प्रदेश- 3
झारखंड- 2
मणिपूर- 1
मिझोराम- 1
मेघालय- 1
अरुणाचल प्रदेश- 1 (बिनविरोध)