breaking-newsराष्ट्रिय

राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्या नलिनीचा तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न

हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्या नलिनीने तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं वृत्त आहे. त्यापूर्वी तिचं कारागृहात भांडण झाल्याची माहिती मिळत आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणात नलिनी सध्या तमिळनाडू येथील वेल्लोर कारागृहात शिक्षा भोगत आहे. नलिनी आणि तिच्या सहकारी कैद्यामध्ये काही कारणावरून वाद झाला होता. त्या वादाचं रुपांतर कडाक्याच्या भांडणात झालं. या भांडणानंतर नलिनीने साडीचा गळफास लावून आत्महत्या करायचा प्रयत्न केला.

नलिनी हिच्या वकिलाने तिच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची माहिती दिली आहे. नलिनीने इतक्या वर्षांत प्रथमच इतकं टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याचं कारण काहीतरी वेगळं असावं, असा अंदाज नलिनीच्या वकिलाने बोलून दाखवला आहे. नलिनी गेल्या 29 वर्षांपासून कैदेत आहे. ती लिट्टे या दहशतवादी संघटनेशी संबंधित होती. लिट्टेसाठी काम करणाऱ्या मुरुगन श्रीहरण याच्याशी तिने विवाह केला होता. राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात नलिनीला जेव्हा अटक झाली तेव्हा ती दोन महिन्यांची गर्भवती होती. तिची मुलगी अरिथ्रा ही सध्या लंडनमध्ये डॉक्टर म्हणून काम करते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button