breaking-newsराष्ट्रिय

योगींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅंडींग

कासगंज – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरचे आज येथील एका शेतात इमर्जन्सी लॅंडिग करावे लागले. तथापी मुख्यमंत्री सुखरूप असून तेथून ते पुढील कार्यक्रमाला रवानाही झाले अशी माहिती गृह विभागाचे सचिव अरविंदकुमार यांनी दिली. हे हेलिकॉप्टर आज कस्तुरबा गांधी विद्यालयात उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या हेलिपॅडवर उतरणार होते. पण ऐनवेळी हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने ते हेलिपॅडपासून एक किलो मीटर अंतरावर एका शेतात उतरवावे लागले.

कासगंज जिल्ह्यातील फरौली गावातील एकाच कुटुंबातील तीन सदस्यांची हत्या करण्यात आल्याने त्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री आज तिकडे गेले होते. मुख्यमंत्र्यांचे या जिल्ह्यातील सारे कार्यक्रम नियोजनानुसार पार पडले असेही संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button