breaking-newsराष्ट्रिय
येडियुरप्पांना शत्रुघ्न सिन्हा यांनी दिल्या विशेष शुभेच्छा
नवी दिल्ली : कर्नाटकात भाजपला बहुमताचा आकडा गाठता आलेले नाही. त्यातच काँग्रेस-जेडीएस यांना जागा कमी मिळूनही त्यांनी सत्ता स्थापनेसाठी दावा केल्याने भाजपसमोर पेच आहे. त्यातच भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपवर उपहासात्मक भाष्य करून जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप, काँग्रेस, जेडीएसचे अभिनंदन करताना भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांना टोलाही लगावला आहे.
निवडणूक जिंकण्याआधी आपल्या शपथविधीची तारीख जाहीर करणाऱ्या येडियुरप्पांचे विशेष अभिनंदन आणि ज्यांनी निवडणुकीसाठी कठोर मेहनत घेतली त्यांचेही अभिनंदन, विजयी कर्नाटका, जय हिंद असे ट्विट शत्रुघ्न सिन्हा यांनी केले आहे.