युपीत पाक दहशतवादी शिरले; अयोध्येत हल्ल्याची शक्यता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/terrorist-2.jpg)
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी दहशतवादी उत्तर प्रदेशमध्ये शिरले आहेत व ते अयोध्येत हल्ला घडवण्याची शक्यता असल्याची देखील माहिती समोर आली आहे. या माहितीनंतर गुप्तचर संस्थांकडून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानातील एका दहशतादी गटाकडून भारतात घातपात घडवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गुप्तचरसंस्थाना मिळालेल्या माहितीनुसार नेपाळमार्गे सात दहशतवादी उत्तर प्रदेशमध्ये शिरले आहेत. अशी माहिती सुत्रांकडून इंडिया टुडेला मिळालेली आहे. प्राप्त माहितीनुसार हे सातही दहशतवादी पाकिस्तानातील सक्रीय दहशतवादी गटाचे सदस्य आहेत. सद्यस्थिती पाहता हे दहशतवादी अयोध्येसह फैजाबाद आणि गोरखपूर या ठिकाणी दडून बसले असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.
या सात दहशतवाद्यांपैकी पाच जणांची ओळख पटली असून, मोहम्मद याकूब, अबू हमजा, मोहम्मद शहाबाज, निसार अहमद आणि मोहम्मद कौमी चौधरी अशी त्यांची नावं आहेत. अयोध्या प्रकरणाचा निकाल लवकरच येणार आहे, या पार्श्वभूमीवर गुप्तचर संस्थांनी ही माहिती अधिकच गांभिर्याने घेतली असल्याचे समजते.