युगांडात सोशल मीडियाच्या वापरावर दररोज 4 रुपये कर लागू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/415198-socialmedia-.jpg)
काम्पाल (युगांडा) – युगांडा सरकारने सोशल मीडियाच्या वापरावर कर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. व्हाटस ऍप, ट्विटर, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या वापरावर दररोज 200 शिलिंग म्हणजे सुमारे 3.75 रुपये कर भरावा लागणार आहे.
युगांडा सरकारने गुरुवारी हा निर्णय जाहीर केला. याचा मुख्य हेतू “गॉसिप’ वर नियंत्रण घालणे हा आहे. मात्र काही लोक याचा अर्थ बोलण्याच्या स्वातंत्र्यवर गदा आणणे असा काढ़त आहेत. सन 2016 च्या अहवालानुसार युगांडाचे दरडोई उत्पन्न 666. 10 अमेरिकन डॉलर्स आहे. य तुटपुंज्या उत्पन्नात लोकांना उदरनिर्वाह करणे मुश्किल झालेले आहे, अशा अवस्थेत हा कर लादणे अन्याय असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
युगांडाचे राष्ट्रपती योवेरी मुसेवेनी यांनी संसदेने सादर केलेल्या या कायद्याचे समर्थन केले आहे. सोशल मीडिया गप्पांच्या, अफवांच्या पिकांचे केंद्र आहे. त्यामुळे त्यांनी हा कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. हा कर 1 जुलैपासून लागू होणार असला तरी त्याची आकारणी सरकार कशी करणार हा एक प्रश्नच आहे. सन 2016 मध्ये योवेरी मुसेविनी हे राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवत असताना त्यांनी सोशल मीडियाच्या वापरावर निलंबन घातले होर्ते. आता सोशल मीडियाला कायद्याच्या कक्षेत आणण्याचा प्रयोग करण्यात येत आहे. युगांडाप्रमाणेच पापुआ न्यू गिनीसारख्या देशांनीही सोशल मीडियाच्या अतिवापरावर नियंत्रण आणले आहे.