breaking-newsराष्ट्रिय

यापुढे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेमध्ये असणार ब्लॅक बॉक्स

लखनऊ: रेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यापुढे रेल्वे गाड्यांमध्ये विमानांप्रमाणेच ब्लॅक बॉक्स असणार आहे. ब्लॅक बॉक्स असलेल्या रेल्वेच्या डब्ब्यांचे अनावरण रायबरेलीतील रेल कोच फॅक्टरीमध्ये करण्यात आले. रेल्वे गाड्यांमधील ब्लॅक बॉक्स अपघात रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

‘ब्लॅक बॉक्स असलेले स्मार्ट कोचेस रेल्वे वाहतूक क्षेत्रात मैलाचा दगड ठरणार आहेत. यामुळे रेल्वे प्रवास आणखी सुरक्षित आणि सुखकर होईल,’ असे रायबरेली कोच फॅक्टरीचे व्यवस्थापक राजेश अगरवाल यांनी सांगितले. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त ब्लॅक बॉक्स असलेल्या स्मार्ट कोचेसचे अनावरण करण्यात आले. ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून अंतर्गत वायर्सचे तापमान मोजले जाईल. याशिवाय केबलची स्थितीदेखील तपासली जाईल. त्यामुळे शॉर्ट सर्किट आणि त्यामुळे होणारे नुकसान टाळता येऊ शकेल. ब्लॅक बॉक्समुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होईल. याशिवाय त्यांना मिळणाऱ्या सुविधांमध्येही वाढ होईल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button