breaking-newsराष्ट्रिय

‘मोदी सरकार पुन्हा सत्तेत न आल्यास पाकिस्तान संसदेवर हल्ला करेल’, भाजपा नेत्याचे वक्तव्य

आसाममधील भाजपाच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेते हेमंत बिस्वा शर्मा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा पुन्हा सत्तेत न आल्यास पाकिस्तानी लष्कर किंवा दहशतवादी भारतीय संसदेवर तसेच आसाममधील विधानसभेच्या इमारतींवर हल्ला करतील’, असे मत शर्मा यांनी व्यक्त केले आहे. तसेच भाजपा सत्तेत नसल्यास या हल्ल्यांना उत्तर देण्याचे सामर्थ्य भारताकडे नसेल असेही शर्मा म्हणाले आहेत.

नागाव तालुक्यातील कामापूर येथे निवडणुक प्रचारसभेदरम्यान दिलेल्या भाषणामध्ये शर्मा यांनी हे वक्तव्य केले. आपण भारतामध्ये आणि आसाममध्ये मोदी सरकारला पुन्हा निवडूण न दिल्यास पाकिस्तानी लष्कर किंवा दहशतवादी आपल्या देशावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते भारतीय संसद तसेच आसाम विधानसभेच्या इमारतींवर हल्ला करतील आणि त्यावेळी भारतीय पंतप्रधानांकडे त्या हल्ल्याला उत्तर देण्याची हिंमत नसेल असं शर्मा म्हणाले. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींसारखी व्यक्तीच योग्य असल्याचे सांगताना शर्मा यांनी, ‘नवीन भारताला उत्तर देणे ठाऊक आहे. तसेच मोदींकडे पाकिस्तानविरोधात योग्य ती पावले उचलण्याची हिंमत आहे’ असंही सांगितलं.

आसामच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थ, आरोग्य यासारख्या महत्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी असणाऱ्या शर्मा यांनी पुलवामा हल्ल्यानंतर राज्यात पाकिस्तानबद्दल सहानभुती दाखवणाऱ्या १३० जणांना अटक करण्यात आल्याची माहितीही या प्रचारसभेत दिली. आसाममधील काही तरुणांनी सोशल मिडियावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ सारखे मेसेजेस लिहीले. आपल्या राज्यात अशाप्रकारच्या शक्ती कुठून आल्या याबद्दल विचार करणे गरजेचे असल्याचे मत शर्मा यांनी व्यक्त केले. तसेच सोशल मिडियावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ सारखे संदेश लिहिणाऱ्यांना काँग्रेस शरण गेल्याचा आरोपही शर्मा यांनी केला आहे. मुळचे बंगाली पण आसामी मातृभाषा असणारे मुस्लिम आसाममध्ये ना-एक्सोमिया नावाने ओळखले जातात. हे मुस्लिम मनाने पाकिस्तानबरोबर असून भारताबरोबर नसल्याचेही शर्मा म्हणाले.

‘आसाममध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली आपण एकत्र आलो नाही तर एक दिवस ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणारे हे लोक आपला प्रदेश आणि संस्कृती नष्ट करतील. म्हणूनच आमची लढाई केवळ विकासासाठी नाही तर विकासाचाच्या राजकारणाबरोबरच आपली ओळख टिकवून ठेवण्याचाही आमचा प्रयत्न आहे. एकीकडे आम्ही विकासासाठी लढत आहोत तर दुसरीकडे आम्ही आपली मूळ ओळख, जमिनी आणि संस्कृती टिकवण्यासाठी लढणार आहोत,’ असं शर्मा यांनी या वेळी बोलताना सांगितले. आसामच्या विकासाबरोबरच पाकिस्तानबद्दल सहानभुती असणाऱ्यांबद्दल झिरो टॉलरन्स पॉलिसी अवलंबली जाणार असल्याचे भाजपाने याआधीच जाहीर केले असल्याची आठवणही शर्मा यांनी यावेळी करुन दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button