breaking-newsराष्ट्रिय

मोदी सरकारचे केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट; ‘एवढी’ झाली महागाई भत्त्यात वाढ

नवी दिल्ली –  केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सना  मोदी सरकारने एक मोठे गिफ्ट दिले आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सरकारने २ टक्क्यांनी वाढ केली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सातत्याने वाढणारी महागाईमुळे महागाई भत्त्यात वाढ व्हावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत २ टक्क्यांनी महागाई भत्ता वाढविण्यात आला आहे. याचा लाभ १. ० कोटी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सना मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार ही  वाढ करण्यात आली आहे. याआधी ७ टक्क्यांनी मिळणारा महागाई भत्ता आता ९ टक्क्यांनी मिळणार आहे.

दरम्यान, याआधीही याचवर्षीच्या मार्चमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ केली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button