breaking-newsराष्ट्रिय

मोदी सरकारचा जाहिरातीबाजीवर ४३४३ कोटींचा खर्च

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गेल्या ४६ महिन्यांत जाहिरातबाजीवर ४३४३.२६ कोटी रुपये खर्च केले आहेत. मोदी सरकार जाहिरातबाजीवर कोट्यवधी रुपये खर्च करत असल्यावरून टीका होत असल्यानं या वर्षी प्रचार खर्चात २५ टक्क्यांची घट झाली आहे. केंद्र सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत विविध जाहिरातींवर किती खर्च झाला आहे, याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे मागितली होती.

त्यावर केंद्र सरकारच्या ‘ब्युरो ऑफ आऊटरीच अँड कम्युनिकेशन’ विभागाचे अर्थ सल्लागार तपन सूत्रधर यांनी १ जून २०१४ पासून आतापर्यंतच्या जाहिरातींची माहिती दिली आहे. यात १ जून २०१४ ते ३१ मार्च २०१५ दरम्यान ४२४.८५ कोटी रुपये प्रिंट मीडिया, ४४८.९७ कोटी रुपये इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि ७९.७२ कोटी रुपये खर्च अन्य पद्धतीनं केलेल्या प्रचारावर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, मागील वर्षींच्या आकडेवारीनुसार यंदा जाहिरातींवरील खर्च थोडा कमी झाल्याचे दिसते. १ एप्रिल २०१७ ते ७ डिसेंबर २०१७ दरम्यान ३३३.२३ कोटी रूपये मुद्रित माध्यम. १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ दरम्यान इलेक्ट्रॉनिक माध्यमावर ४७५.१३ कोटी रूपये तर बाह्य खर्चावर १४७.१० कोटी रूपये खर्च करण्यात आला. हा १ एप्रिल २०१७ ते ३१ जानेवारी २०१८ पर्यंतचा खर्च आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button