मोदी आता सिंगापुर, इंडोनेशिया दौऱ्यावर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/modi-wb_20.jpg)
नवी दिल्ली – लागोपाठच्या चीन आणि रशियाच्या दौऱ्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात इंडोनेशिया आणि सिंगापुरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. साऊथईस्ट अशियाशी असलेल्या भारताच्या संबंधांना नवा आयाम देण्याचा प्रयत्न त्यांच्या या भेटीतून अपेक्षित आहेत. मोदी हे 29 मे रोजी इंडोनेशियात दाखल होतील तेथे दोन दिवस राहून ते 31 मे रोजी सिंगापुरला रवाना होतील. सिंगापुरला ते शांग्रीला डॉयलॉग परिषदेत भाषण करणार आहेत. तेथे विविध देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत.
शांग्रीला डॉयलॉग परिषदेत भाषण करणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. ही परिषद सन 2002 मध्ये स्थापन करण्यात आली आहे. इंडो-पॅसिफिक संबंधांबाबत भारताची भूमिका ते या परिषदेत मांडणार आहेत. भारताने लूक ईस्ट हे विदेशनीतीचे धोरण अवलंबले आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा सिंगापुर आणि इंडोनेशिया दौरा महत्वाचा मानला जात आहे.