breaking-newsआंतरराष्टीय
मोदींनी घेतले मुक्तीनाथ मंदिराचे दर्शन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/muktinath-modi-1.jpg)
काठमांडु – नेपाळ दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुक्तिनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. हे मंदिर हिंदु आणि बौद्धांसाठी श्रद्धेचे ठिकाण आहे. मोदींनी बौद्धांचा पारंपारीक वेष परिधान करून तेथे हिंदु आणि बौद्ध या दोन्ही पद्धतीने पुजा केली. त्यानंतर त्यांनी पशुपतीनाथ मंदिरात जाऊनही पुजा केली.
मंदिराच्या विश्वस्थांनी त्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. मुक्तीनाथाचे हे मंरि थोरोंग ला पास भागातील पर्वतराजीत आहे. नेपाळच्या मुस्तांग जिल्ह्यातील हे मंदिर प्राचीन असून ते 3710 मीटर उंचीवर वसले आहे. काठमांडु महानगर पालिकेतर्फे त्यांचा नंतर मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.