Breaking-news
मोदींच्या राज्यात धर्मनिरपेक्षतेला धोका- आर्चबिशप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/Archbishop.jpg)
नवी दिल्ली : आर्चबिशप अनिल काउटो यांनी २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीसंबंधी दिल्लीतील ख्रिश्चन धर्मगुरुंना लिहिलेले एक पत्र वादात सापडले आहे. देशातील धर्मनिरपेक्षता धोक्यात असून देशासाठी प्रार्थना करा असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. या पत्रात त्यांनी प्रार्थना सभा आयोजित करण्याचे आवाहन केलं आहे. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी उपवास ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केलं.
देशातील तापलेल्या राजकीय वातावरणामुळे संविधानातील लोकशाही तत्व आणि धर्मनिरपेक्षतेला धोका निर्माण झाला आहे. देशासाठी आणि राजकीय नेत्यांसाठी प्रार्थना करणे आपली पवित्र प्रथा आहे. २०१९ मध्ये आपल्या देशात नवीन सरकार असेल त्यामुळे आतापासूनच प्रार्थना मोहिम सुरु करुया असे आर्चबिशप यांच्या पत्रात म्हटले आहे.