breaking-newsराष्ट्रिय

मेहूल चोक्सीविरोधात ईडीचे नवे आरोपपत्र; प्रत्यार्पण प्रक्रियेला वेग येणार

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सीविरोधात सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) नवीन आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. चोक्सीने लॅबमधील हिरे आणि सपंत्ती विकून हिंदुस्थान, दुबई आणि अमेरिकेसह इतर ठिकाणच्या आर्थिक संस्था, ग्राहक आणि कर्जदार यांना फसवण्यासाठी कशाप्रकारे रॅकेट चालवले, याची माहिती या नव्या आरोपपत्रात देण्यात आली आहे. या नव्या आरोपपत्रामुळे अँटीगुआचे नागरिकत्व घेतलेल्या चोक्सीच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. काही आठवड्यांपूर्वीच हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

13 हजार 500 कोटींच्या पीएनबी घोटाळ्यात निरव मोदीसह मेहूल चोक्सी मुख्यआरोपी आहे. पीएनबी घोटाळा उघडकीस येण्याआधी दोघांनीही देशातून पलायन केले आहे. चोक्सीने अँटीगुआचे नागरिकत्व घेण्यासाठी तिथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आणि तेथील नागरिकत्व घेतले. या घोटाळा प्रकरणात अटक टाळण्यासाठी त्याने देशातून पलायन केले. तसेच अँटीगुआचे नागरिकत्वही घेतले. मात्र, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयरोगावरील उपचारासाठी आपण परदेशात असल्याचे चोक्सीने सांगितले आहे. तसेच अनेकदा प्रकृती अस्वास्थ आणि उपचाराची सबब देत हिंदुस्थानात परतण्यास नकार दिला आहे. याआधी ईडीने 2018 मध्ये पीएनबी घोटाळ्याप्रकरणी चोक्सीविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. आता या नव्या आरोपपत्रामुळे त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button