मुलीवर बलात्काराचा आरोप असलेल्या इसमाने भर कोर्टातच केली पत्नीची हत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/1Murder_107.jpg)
- आसाम मधल्या द्रिबुगड जिल्ह्याचा प्रकार
गुवाहाटी – आपल्याच मुलीवर बलात्काराचा आरोप असलेल्या एका इसमाने भर कोर्टातील सुनावणीच्या दिवशीच कोर्टाच्या आवारात आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना द्रिबुगड जिल्हयातील जिल्हा आणि सत्र न्यायालयात काल घडली. या घटनेनंतर कोर्टाच्या आवारात उपस्थित असलेल्या अन्य लोकांनी त्याच्यावर कब्जा केला आणि त्याला पोलिसांच्या हवाली केले. पुर्णा नहार डेका असे या आरोपीचे नाव आहे.
या घटनेच्या संबंधात माहिती देतना दिब्रुगडचे डेप्युटी सुपरिन्टेडेंट प्रदीप सैकिया यांनी सांगितले की या आरोपीवर त्याच्या स्वताच्या मुलीवर बलात्कार केल्याचा खटला सुरू असून या प्रकरणात त्याला नऊ महिन्याच्या कारावासानंतर जामीन मंजुर झाला आहे. काल तो कोर्टात याच प्रकरणाच्या सुनावणीसाठी आला होता. त्याच्या बायकोही तेथे त्यावेळी आली होती व ती या प्रकरणातील तक्रारदार आहे. तिला पाहिल्यानंतर त्याने आपल्या खिशातील धारदार चाकू काढला आणि त्याने थेट बायकोचा गळाच चिरला. तिला त्वरीत रूग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्यापुर्वीच ती मरण पावली होती. या भीषण प्रकारामुळे कोर्टाच्या आवारात मात्र चांगलीच खळबळ उडाली होती.