मालदीवची आता पाकिस्तानशी हातमिळवणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/maldives-6.jpg)
नवी दिल्ली – मालदीवने आता जवळपास प्रत्येक महिन्यालाच भारतापुढे अडचणी निर्माण करण्याचे धोरण स्वीकारलेले दिसते आहे. या आधी भारताचे तेथे तैनात असले हेलिकॉप्ट काढून घेण्याची सूचना त्या देशाने केली होती. त्यानंतर मालदीवने भारतीय नौदल कर्मचाऱ्यांना आपल्या देशाचा व्हीसा देण्याचे बंद केले होते.
आता त्या देशाने पाकिस्तानशी अधिक जवळीक साधण्यास सुरूवात केली असून त्यांनी पाकिस्तानशी करार करून विज निर्मीती क्षमता वाढवण्याचे ठरवले आहे. चीनशी त्या देशाने या आधीच जवळीक साधली असून आता त्यांनी पाकिस्तानशी जवळीक साधून भारतापुढील अडचण वाढवून खोडसाळपणा केला आहे.
पाकिस्तानकडे मोठी आर्थिक क्षमता नाही. त्यामुळे ते मालदीवची मदत करू शकत नाहींत पण तरीही भारताचा प्रभाव कमी करण्याच्या प्रयत्नांतूनच मालदीवचे अध्यक्ष यमीन यांनी हा करार केल्याचे सांगितले जात आहे. मालदीव मध्ये पाकिस्तानी अधिकाऱ्यांचा वावर वाढला तर भारताच्या दृष्टीने ते एक मोठे सुरक्षा आव्हान असणार आहे.