breaking-newsराष्ट्रिय

महिलेने पतीची हत्या करुन केले आठ तुकडे, घरमालकाला घरात सापडला पुरलेला हात

दिल्लीमधील अमृत विहार येथे एका घरात पुरलेलं हाताचं बोट सापडल्याने एकच खळबळ माजली होती. हे बोट कोणाचं आहे याचा शोध घेत असताना बेपत्ता झालेल्या 63 वर्षीय भाडेकरुचं असल्याचं निष्पन्न झालं. गेल्या अनेक आठवड्यांपासून भाडेकरु बेपत्ता होता. पत्नीने त्याची हत्या करत आठ तुकडे केले होते. यामधील काही भाग बेडरुममध्ये पुरण्यात आले होते.

राजेश आणि त्याची 38 वर्षीय पत्नी सुनिता नेहमी एकमेकांवर संशय घेत होते. यावरुनच त्यांच्यात भांडणंही होत होती. 14 फेब्रुवारीला सुनिताने राजेशची हत्या केली आणि मृतदेहाचे आठ तुकडे केले. वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहाचे तुकडे पुरण्यात आले होते. सुनिताने बेडरुममध्येही काही भाग पुरुन ठेवले होते. घऱात खोदकाम केलेलं पाहून घरमालकाला संशय आला आणि पुरलेलं बोट सापडलं. पोलिसांनी सुनिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्हा कबूल केला.

14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी सुनिताने रोज होणाऱ्या भांडणांना कंटाळून राजेशचा काटा काढायचं ठरवलं. सुनिता टीव्हीवर क्राइम शो पाहत असे आणि त्यातूनच तिने संपूर्ण हत्येचा कट आखला होता. तिने राजेशच्या पेयात गुंगीचं औषध मिसळलं. आपल्याला येण्यास उशीर होणार असल्याचं सांगत मुलाला शेजाऱ्यांच्या घऱी पाठवलं. राजेश गुंगीत असतानाच चाकूने वार करुन हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे करुन वेगवेगळ्या बॅगांमध्ये भरले.

मृतदेहाचे काही भाग तिने घरातच पुरले आणि बाकीचे घेऊन घराबाहेर पडली. दोन दिवसांनी सुनिताने पोलीस ठाण्यात राजेश बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. शेजाऱ्यांमध्ये राजेश अचानक बेपत्ता झाल्याची चर्चा सुरु झाली होती. यादरम्यान, पोलिसांना एका अज्ञात मृतदेहाचं शीर सापडलं. पण ते कोणाचं आहे याचा शोध लागत नव्हता. पण राजेशच्या घऱमालकाला घरात खोदकाम केल्याचं दिसलं आणि सगळा प्रकार उघडकीस आला.

राजेश नेहमी सुनितावर विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेत असे. यामुळे त्यांच्यात रोज भांडण होत होते. सुनिताने आपली आई बेपत्ता झाल्यासाठी राजेशला जबाबदार ठरवलं होतं. दरम्यान सुनिता न्यायालयीन कोठडीत असून तिहार जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button