महाराणा प्रताप हेच श्रेष्ठ- योगी आदित्यनाथ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/Yogi-Adityanath-.jpg)
जयपूरच्या महाराज मानसिंग यांनीदेखील त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाराणा प्रतापांनी अकबराचे सम्राटपद कधीच मान्य केले नाही. मी तुर्कांवर कधीच विश्वास ठेवणार नाही, असे त्यांनी अकबराला ठणकावून सांगितल्याचा इतिहास योगींनी उपस्थितांसमोर मांडला.
त्याकाळी अनेक राजांनी आपला स्वाभिमान गहाण टाकून अकबराचे सम्राटपद मान्य केले. मात्र, महाराणा प्रताप त्याला अपवाद ठरले. त्यांचे हे विचार आजच्या काळातही लागू पडतात. सध्या काही लोक वैयक्तिक स्वार्थापायी स्वत:चा समाज, संस्कृती आणि देशातील वातावरण गढूळ करायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सर्वांचे नुकसान होत आहे. यावेळी योगी आदित्यनाथांनी अनुसूचित जाती-जमाती आणि मागासवर्गीयांना आवाहन केले की, तुम्ही स्वत:ला महाराणा प्रतापांचे वंशज समजा. याच सर्व लोकांच्या पाठिंब्यामुळे महाराणा प्रताप इतके महान राजे ठरले. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्येही त्यांनी अकबराच्या सैन्याशी लढा दिला आणि ते शेवटपर्यंत शत्रूच्या हाताला लागले नाहीत, असे योगींनी सांगितले.