breaking-newsआंतरराष्टीय

महाभयानक! आगीत तब्बल 50 कोटी वन्यजीवांचा जळून मृत्यू

मेलबर्न | महाईन्यूज

ऑस्ट्रेलियात जंगलात लागलेल्या आगीने आतापर्यंत 23 जणांचा बळी घेतला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शनिवारी 3 हजार रिजर्व्ह सैनिकांना बोलावून घेतले आहे. पंतप्रधान मॉरिसन यांनी सांगितले की, आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. कांगारूबेटावरील महामार्गावरील आगीत दोन जणांचा मृत्यू झालेला आहे. मात्र, या आगीत जवळपास 50 कोटी प्राणी अन् पक्षांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये हजारो कोआला प्राण्यांचा समावेश आहे.

हफिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या इकोलॉजिस्ट यांच्या संशोधनानुसार या आगीत 480 मिलियन्स म्हणजेच जवळपास 48 कोटी प्राणी अन् पक्षांचा होरपळून जीव गेला आहे. दक्षिण गोलार्धातील सूर्याच्या प्रवेशाने ऑस्ट्रेलियातील जंगलात आगीच हंगाम सुरू झाला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा जीव गेलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button