breaking-newsराष्ट्रिय
मशीद पक्षकारांनीही मध्यस्थांचे निमंत्रण फेटाळले
रामजन्मभूमी-बाबरी प्रकरणातील एक पक्षकार रामलल्ला विराजमान यांनी मध्यस्थी प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयास कळविल्यानंतर मशिदीसाठी युक्तिवाद करणाऱ्या पक्षकारानेही सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या मध्यस्थांचे निमंत्रण फेटाळले आहे.
रामलल्ला विराजमानचे वकील सी. एस. वैद्यनाथन यांनी ३०सप्टेंबर रोजी न्यायालयास आपण मध्यस्थी प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचे कळविले. त्यानंतर मध्यस्थांनी २ ऑक्टोबर रोजी इजाज मकबूल या मुस्लीम पक्षकाराच्या वकिलांना पत्र लिहिले आणि दिल्लीत ८ ऑक्टोबर रोजीच्या बैठकीचे निमंत्रण दिले. मात्र आपण न्यायालयातील प्रक्रियेमध्ये खूप व्यस्त असल्याचे मशिदीच्या वतीने सांगण्यात आले. ही बैठक कोणी आयजित केली आहे त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे मशिदीच्या वतीने मध्यस्थांना विचारण्यात आले आहे.