ममतांचा चीन दौरा रद्द
कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला चीनचा दौरा रद्द केला आहे. त्या एका बैठकीसाठी चीनला जाणार होत्या त्या बैठकीसाठी संबंधीत राजकीय पातळीवरून कन्फर्मेशन न मिळाल्याने त्यांनी हा दौरा रद्द केला आहे असे कारण यासाठी सांगितले गेले आहे. नियोजित कार्यक्रमानुसार आज रात्रीच त्या चीनला रवाना होणार होत्या. त्यांचा हा दौरा रद्द झाल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषम स्वराज यांना कळवण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी दिली.
भारताच्या चीन मधील राजदूताने ममता बॅनर्जी यांच्या प्रस्तावित कार्यक्रमाबद्दल संबंधीत चीनी अधिकाऱ्यांकडून कन्फर्मेशन मिळवण्याचा कसोशिचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्यात यश न आल्याने चीन मध्ये जाण्यात काही अर्थ उरला नसल्याने त्यांनी हा दौरा रद्द केला आहे. तथापी आपण भविष्यातही भारत आणि चीन यांच्यात सलोख्याचे संबंध कायम राहावेत यासाठी प्रयत्न करू असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.