breaking-newsराष्ट्रिय

मनोज सिन्हा जम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल

जम्मू – जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल गिरीष चंद्र मूर्मू यांनी बुधवारी सायंकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला असून आता जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपालपदी भाजपा नेते आणि माजी मंत्री मनोज सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गिरीष चंद्र मूर्मू यांनी ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपालपदाची शपथ घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात काश्मीर शांतता, स्थिरता आणि विकासाच्या मार्गावर पुढे गेल्याचे सांगण्यात येते. महत्त्वाचे म्हणजे ५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याला एक वर्ष पूर्ण झाले. याच दिवशी मूर्मू यांनी आपल्या उपराज्यपालपदाचा राजीनामा दिला.

दरम्यान, जम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल मनोज सिन्हा हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळेच त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. तर मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button