breaking-newsआंतरराष्टीय
भारतीय इंजिनीअरच्या मारेकऱ्याला अमेरिकेत जन्मठेपेची शिक्षा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/shriniwas-kuchibhotla.jpg)
वॉशिंग्टन : भारतीय इंजिनीअर श्रीनिवास कुचिभोतला यांची हत्या करणाऱ्या अमेरिकन नौदल सैनिकाला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. वंशभेदावरून कुचिभोतला यांची हत्या करण्यात आली होती.
अॅडम डब्ल्यु पुरिंटन असे या ५२ वर्षीय मारेकऱ्याचे नाव आहे. ‘माझ्या देशातून बाहेर निघून जा,’ असं अॅडमने गोळ्या झाडण्यापूर्वी श्रीनिवास आणि त्याच्या मित्राला म्हटलं होतं. श्रीनिवास आपल्या मित्रासोबत ओलाथे शहरातील एका बारमध्ये होते. तेथे अॅडमने केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला, तर मित्र आलोक मदसानी जखमी झाला होता. या घटनेनंतर भारतासह अमेरिकेत एकच संतापाची लाट उसळली होती. हत्येची ही घटना धक्कादायक असून आम्ही या घटनेचा निषेध करत आहोत असे व्हाइट हाउसने म्हटले होते.