भारताप्रमाणेच चीनमध्येही आधार कार्ड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/china-national-flag-.png)
बीजिंग (चीन) – भारताप्रमाणेच चीनमध्येही आधार कार्ड योजना सुरू करण्यात आलेली आहे. पंतप्रधान मोदींच्या सरकारने आधार कार्ड हा एक महत्त्वाचा दस्तावेज बनवला आहे आणि त्याच्या आधारे अनेक कामे सोपी सुलभ करून टाकली आहेत. अनेक कामांसाठी आधार कार्ड जोडणे ही गोष्ट अनिवार्य केले आहे. या गोष्टीचे अनेक फायदे दिसून येत आहेत आणि आधार कार्डाबाबत उलटसुलट चर्चाही मोठ्या प्रमाणावर होत आहे.
त्या पार्श्वभूमीवर आता चीनमध्येही आधार कार्डावर काम चालू करण्यात आले आहे त्यांचे हे काम जगातील सर्वात मोठा डाटाबेस सिद्ध होणार आहे. कारण यात चीनमधील 140 कोटी जनतेची माहिती जमा होणार आहे चिनी आधार कार्ड म्हणजे एक प्रकारचे सोशल क्रेडिट सिस्टिम म्हणता येईल. सन 2020 पर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे
पहिल्या टप्प्यात चीनमधील आधार कार्डांद्वारे कार्डधारकांना आर्थिक रेटिंग देण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात शिक्षेची तरतूद आणि सोशल मीडियावरील काही व्यवहारांबाबत महत्त्वाचे घटक जोडले जाणार आहेत. वाईट रेटिंग असणारांची नावे “ब्लॅक लिस्ट’ मध्ये टाकण्याची तरतूद आहे.
सुमारे 90 कोटी व्यक्तींना कोर्ट केसेस वा डिफॉल्टमुळे ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे. त्यांच्या विमानप्रवासावरही बंदी घालण्यात आली आहे 30 लाख व्यक्तींच्या रेल्वे प्रवासावर बंदी घालण्यात आलेली आहे. या कामासाठी चीनमध्ये अलिबाबा, व्ही चॅट अशा कंपन्यांचा डाटा वापरत आहे. चीनमध्ये ऑनलाईन खरेदी आणि पेमेंट मोठ्या प्रमाणावर चालू आहे. त्यामुळे कोट्यवधी लोकांच्या क्रेडिट रेकॉर्डची तपासणी करंणे सहज शक्य आहे, त्यावरूच सर्वांना रेटिंग देण्याची तयारी चालू आहे.