Breaking-newsराष्ट्रिय
भारतात २४ तासांत तब्बल ७५ हजार ७६० नवे कोरोना रुग्ण
![# Covid-19: Worrying! Even after vaccination, many suffer from coronary heart disease](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona_positive-2.jpg)
नवी दिल्ली – भारतात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. देशभरात मागील चोवीस तासांमध्ये तब्बल ७५ हजार ७६० नवे कोरोनाबाधित आढळले असून १ हजार २३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासह देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता ३३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
भारतातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ३३ लाख १० हजार २३५ वर पोहचली आहे. यापैकी २५ लाख २३ हजार ७७२ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या ७ लाख २५ हजार ९९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत २५ लाख २३ हजार ७७२ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
दरम्यान, जगात सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारत आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलला भारताने मागे टाकले आहे. तर पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे.