breaking-newsआंतरराष्टीय

भारतातील सार्वत्रिक निवडणूक वेळेआधीच होतील; चीनने वर्तवले भाकित

नवी दिल्लीः भारतातील भाजपा आणि मोदींची लोकप्रियता सातत्याने घटत असून भारतातील सार्वत्रिक निवडणूक वेळेआधीच होईल, असा अंदाज शिन्हुआ या चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने व्यक्त केला आहे.

२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभरात मोदी लाट उसळली होती. या अभूतपूर्व यशानंतर, पुढच्या तीन वर्षांत अनेक राज्यांमध्ये भाजपाचं कमळ उमलले. त्यांचा विजयरथ रोखण्यात काँग्रेससह सर्वच विरोधक निष्प्रभ ठरत होते. परंतु, येत्या काळातील निवडणुका भाजपासाठी कठीण असतील, असे चित्र आता दिसू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर, चीनच्या वृत्तसंस्थेनं रविवारी लिहिलेल्या लेखातही मोदी सरकारसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे.

गो-हत्याबंदी आणि गोमांस प्रकरणात जमावाकडून झालेल्या हत्यांमुळे मोदी सरकारची लोकप्रियता घसरू लागली. त्यानंतर, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे जनतेची नाराजी अधिकच वाढली. त्याचाच फटका भाजपाला पोटनिवडणुकांमध्ये बसला. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि बिहारमधील पोटनिवडणुकीत त्यांना आपले गड गमवावे लागले. त्यामुळे येत्या काळात भाजपाला सरकारविरोधी लाटेचा सामना करावा लागेल, असे शिन्हुआमधील लेखात नमूद करण्यात आलंय. लोकनीती आणि सीएसडीएसच्या सर्वेक्षणाचाही त्यांनी आधार घेतला आहे. मोदी सरकारने अपेक्षाभंग केल्याची भावना वाढत असल्याचं या सर्वेक्षणातून समोर आले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button