Breaking-newsराष्ट्रिय
भाजपच्या अभियानाअंतर्गत अमित शहांनी घेतली बाबा रामदेव यांची भेट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/amit-shah-6.jpg)
नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या समर्थनासाठी संपर्क या अभियाना अंतर्गत पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज बाबा रामदेव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना केंद्र सरकारने गेल्या चार वर्षात केलेल्या कामाची माहिती दिली. केंद्र सरकारला गेल्या 26 मे रोजी चार वर्ष पुर्ण झाली त्यानिमीत्त हे अभियान हाती घेण्यात आले आहे.
स्वत: शहा या अभियाना अंतर्गत देशातील 50 प्रमुख व्यक्तींना भेटणार आहेत. या अभियानाची सुरूवात त्यांनी माजी लष्कर प्रमुख दलबीरसिंग सुहाग आणि सुभाष कश्यप यांना भेटून केली होती. त्यानंतर त्यांनी प्रख्यात क्रिकेटपटू कपिल देव यांचीही भेट घेतली आहे.