Breaking-news
भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी.एस.येडियुरप्पा आघाडीवर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/yeddy_7.jpg)
बंगळूरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी.एस. येडियुरप्पा शिकारीपूरा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. शिकारीपूरा विधानसभा मतदारसंघ येडियुरप्पांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
काँग्रेस उमेदवार गोनी मालातेषा पिछाडीवर पडले आहेत. या मतदारसंघात लिंगायत समाजाची मते निर्णायक असून येडियुरप्पा लिंगायत समाजाचे आहेत. त्यामुळे ते भाजपाने मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनवले आहे. कर्नाटकात भाजपचा विजय होईल व आपणच कर्नाटकाचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ असा दावा येडियुरप्पा यांनी केला आहे. भाजपने २००८ साली येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकात दणदणीत विजय मिळवल्यानंतर येडियुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले. पण नंतर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.