breaking-newsराष्ट्रिय

भगतसिंह कोश्यारींकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त पदभार

पणजी – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त ताबा सोपविण्यात आला आहे. गोवा राज्याचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांची बदली झाल्याने कोश्यारींकडे अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची आज गोव्याहून बदली करण्यात आली असून आता ते मेघालयचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या बदलीच्या पत्रकावर स्वाक्षरी केली आहे. तर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तूर्त गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काबो राजनिवासाकडेच आणखी एक नवे राजभवन बांधण्याची घोषणा अलिकडेच केल्यानंतर राज्यपाल मलिक यांनी त्यास तीव्र आक्षेप घेतला होता. मुख्यमंत्र्यांच्या काही निर्णयांवर त्यांनी जाहीरपणे टीका केली होती. २५ ऑक्टोबर २०१९ रोजी सत्यपाल मलिक यांची गोव्यात नियुक्ती करण्यात आली होती.

मलिक हे ऑगस्ट 2018 ते ऑक्टोबर 2019 या काळात जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. त्यांच्याच कार्यकाळात जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम 370 रद्द करण्याचा घटनात्मक निर्णय घेण्यात आला होता. 1974 ते 1977 दरम्यान त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत आमदारकी भूषवली. 1980 ते 1986 मध्ये त्यांनी राज्यसभेवर उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. तर 1989 ते 1991 दरम्यान ते जनता दलाकडून अलिगढचे लोकसभा खासदार होते. ऑक्टोबर 2017 ते ऑगस्ट 2018 दरम्यान ते बिहारचे राज्यपाल होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button