breaking-newsआंतरराष्टीय

ब्रिटन, रशिया, फ्रान्ससह अनेक देशांत कोरोनादरम्यान शाळा सुरू

ब्रिटन, रशिया, युक्रेन, फ्रान्स व जॉर्डनसह जगभरातील अनेक देशांत मंगळवारपासून शाळांना सुरुवात झाली. कोरोनामुळे बहुतांश देशांत मार्चपासून शाळेला टाळे होते. देशभरातील शाळा पुन्हा सुरू झाल्या. आम्ही कोराेनाच्या आव्हानास कमी समजत नाही. परंतु मुलांचे शाळेत जाणे किती महत्त्वाचे आहे, ही गोष्टही समजून घेतली पाहिजे. कारण हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, असे ब्रिटनचे शिक्षणमंत्री गॅविन विल्यम्सन यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सायकल किंवा स्कूटरच्या वापरावर भर दिला जात आहे. त्याशिवाय स्थानिक परिवहन विभागाला ३९३ कोटी रुपयांचा अतिरिक्त मदत निधीही देण्यात आला आहे. हा निधी शालेय विद्यार्थ्यांच्या परिवहन सुविधेवर खर्च केला जाणार आहे. त्याशिवाय शालेय नियंत्रण प्रणालीदेखील लागू करण्यात आली आहे.

त्याअंतर्गत मास्कचा वापर व फिजिकल डिस्टन्सिंगसारख्या सतर्कतेचे पालन केले जाणार आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचे ३ लाखांहून जास्त रुग्ण आढळून आले आहेत. शाळांमध्ये विषाणूसंबंधी सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, अशी ग्वाही राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिली आहे. मॉस्कोच्या शाळांत शिक्षकांना मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांना विद्यार्थ्यांपासून निश्चित अंतर दूर राहण्याचेदेखील आदेश आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button