बॉयफ्रेंडचा केला खून; त्यानंतर वडिलांनी केला आपल्या मुलीसहच विवाह
![Brutally murdered by a lover living in a live-in](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Love-murder.jpg)
वडिलांनी आपल्या मुलीसह विवाह केल्याची धक्कादायक घटना अमेरिकेत घडली. ५५ वर्षीय वडिलांनी आपल्या मुलीच्या प्रियकराची हत्या केली आणि त्यानंतर तिच्याशी विवाह केला. अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनियामध्ये ही धक्कादायक घटना घडली. न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ही घटना समोर आली आहे.
५५ वर्षीय लॅरी पॉल याच्यावर एका व्यक्तीच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॅक्युलर नावाची व्यक्ती लॅरी याच्या मुलीला डेट करत होती. दरम्यान, लॅरी, त्याची मुलगी आणि तिची बहिण यांच्यावर मॅक्युलर याची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. डेली मेलनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. फेब्रुवारी महिन्यात ही घटना घडली आहे.
पोलिसांनी सध्या लॅरी आणि त्याच्या दोन्ही मुलींना अटक केली आहे. मॅक्युलरच्या डोक्यात दारूची बाटली फोडून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याला त्यांनी इंजेक्शन दिलं आणि त्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी त्या व्यक्तीची हत्या करण्यात आली त्याच ठिकाणी वडील आणि मुलगी राहत होते. त्यानंतर त्या दोघांनी लग्नही केलं, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. आपल्या दोन्ही मुलींनी त्याची हत्या करण्यासाठी मदत केली, असल्याची माहिती लॅरी पॉल यानं दिली. सध्या या तिघांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.