breaking-newsराष्ट्रिय

बिहारमध्ये न्यायाधीशांच्या चेंबर्स फोडून केसच्या दस्तावेजांची जाळपोळ

भागलपूर (बिहार) – न्यायाधीशांच्या पाच चेंबर्स फोडून त्यातील खटल्यांशी संबंधित दस्तावेज जाळून टाकल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. नौगाछिया दिवाणी न्यायालयातील न्यायाधीशांच्या पाच चेंबर्स मध्यरात्रीच्या सुमारास काही समाजकंटकांनी फोडल्या आणि अनेक खटल्याचे दस्तावेज जाळून टाकले. विशिष्ट खटल्यांचे दस्तावेज जाळण्यासाठीच या चेंबर्स फोडण्यात आल्या असाव्यात असे नौगाछियाच्या पोलीस अधीक्षक निधी राणी यांनी सांगितले.

निधी राणी यांनी भागलपूर जिल्हा न्यायाधीश रामश्रेष्ठ राय यांच्यासह घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
एसीजेएम (ऍडिशनल चीफ जस्टिस मॅजिस्ट्रेट) आणि एसजे (सब जज) यांच्या चेंबर्समधील जवळपास सर्व दस्तावेज जाळून टाकण्यात आल्याची माहिती दिवाणी न्यायालयातील सूत्रांनी दिली आहे.

नुकतेच बदली होऊन आलेले एडीजे विजय बहादूर यादव आणि सुजित कुमार सिंग यांच्या चेंबर्सही फोडल्या गेल्या असून एसडीजेएम (सब डिव्हिजनल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट पी के पांडे यांच्या चेंबरचे कुलूप फोडण्यात आले आहे.
एसीजेएम सागर यांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध नौगाछिया पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button