बिहारमधील जागा वाटपाबाबत एनडीएची बैठक बोलवा – आरएलएसपीची मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/rajnath-singh1-.jpg)
नवी दिल्ली – जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल एन. एन. व्होरा यांच्याबाबत जम्मू काश्मीर प्रदेश भाजपचे अध्यक्ष रविंद्र रैना यांनी केलेले वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अमान्य केले आहे. व्होरा यांनी राज्यपाल पदावर काम करताना पदाची मर्यादा राखून या जबाबदारीला शोभेल असे काम केले आहे असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
या संबंधात जारी केलेल्या एका निवेदनात राजनाथसिंह यांनी म्हटले आहे की राज्यपालांचे पद हे घटनात्मक पद आहे. त्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने निष्पक्षपातीपणे काम केले पाहिजे. एन.एन. व्होरा हे उत्तम सनदी अधिकारी होते व त्यांनी राज्यपाल पदावर काम करताना या पदाच्या मर्यादा सांभाळल्या आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
जम्मू काश्मीरच्या राज्यपालपदी आम्ही आमच्या पक्षाचा माणूस आणणार होतो म्हणून या राज्याच्या राज्यपालपदाची जबाबदारी व्होरा यांच्याकडून काढून घेऊन ती सत्यपाल मलिक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. व्होरा हे राज्यपाल पदी असताना आपल्याच कामाची टिमकी वाजवत होते अशी टिकाही रैना यांनी केली होती. गेल्या 21 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने व्होरा यांच्या जागी सत्यपाल मलिक यांची नियुक्ती केली आहे. व्होरा यांनी केंद्रीय गृह व संरक्षण खात्याचे सचिव म्हणूनही काम केले होते.